महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

| आगरदांडा | वार्ताहर |

महाराष्ट्र राज्याचा 65 वा वर्धापन दिनानिमित्त मुरुड जंजिरा नगरपरिषद कार्यालयातील प्रांगणात प्रशासक तथा मुख्याधिकारी-पंकज भुसे यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, त्यानंतर सकाळी 7 वाजता ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीतासोबतच राज्य गीत ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ उपस्थितांनी गाऊन ध्वजवंदन करण्यात आल्यानंतर भारत माता की जय, जय जवान जय किसान, वन्दे मातरम, जय भवानी जय शिवाजी, महाराष्ट्र दिनाचा विजय असो, या घोषणा देण्यात आल्या.

मुरुड तहसिलदार कार्यालयातील प्रांगणात मुरुड तहसिलदार-रोहन शिंदे यांच्या शुभहस्ते सकाळी 8 वाजता ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलीस प्रशासकडुन मानवंदना देण्यात आली. तद्नंतर तहसिलदार रोहन शिंदे यांच्या शुभ हस्ते स्वतंत्र सैनिक भगत मॅडम यांना शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी इश्‍वरी मसाल मुलीनी देशभक्तीवर गीत सादर केले.

यावेळी प्रशासकीय अधिकारी परेश कुंभार, सतेज निमकर, पोलिस निरीक्षक निशा जाधव, चिदानंद व्हटकर, मंडळ अधिकारी खुशाल राठोड, मनोज पुलेकर, विजय म्हापुसकर, पांडुरंग आरेकर, मसाल सर, प्रकाश आरेकर, श्रीशैल बहिरगुंडे, नयन कर्णिक, कपिल वेहले, पल्लवी डोंगरीकर, विश्‍वास चव्हाण, स्मिता मुरुडकर, अशोक सबनिस, रूपेश भाटकर, प्रशांत दिवेकर, प्रमोद भायदे, नयन कर्णिक, सतिष जंजिरकर, अभिजित कारभारी, तलाठी रूपेश रेवसकर, राशिद फहीम आदिंसह अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version