| मुरुड जंजिरा | वार्ताहर |
मुरुड नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी-पंकज भुसे यांच्या हस्ते मुरुड नगरपरिषद कार्यालयातील व आझाद चौकातील ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली. यावेळी पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, तहसीलदार रोहन शिंदे, माजी नगराध्यक्षा स्नेहा पाटील, मंगेश दांडेकर, नौसिन दरोगे, सर्व शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी ‘भारत माता की जय, स्वातंत्र्य दिनाचा विजय असो’ अशा घोषणा देण्यात आल्या. दरम्यान, प्रभारी तहसीलदार गोविंद वाकडे यांच्या हस्ते स्वातंत्र्सैनिक सुनंदा भगत यांना श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी नायब तहसीलदार गोविंद कोटंबे, पोलीस निरीक्षक नितीन गवारे, निवडणूक नायब तहसीलदार अमित पुरी, मंडळ अधिकारी तलाठी आदींसह मान्यवर उपस्थित होते.