। कोर्लई । वार्ताहर ।
शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या कोकण एज्युकेशन सोसायटीचा 104 वा वर्धापन दिन वि.के.हायस्कूलच्या प्रांगणात उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शाळा समितीचे सभापती तथा शिक्षक आ.बाळाराम पाटील यांच्या हस्ते संस्थेच्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विरोधी पक्षनेते तथा शालेय समितीचे सदस्य प्रीतम म्हात्रे, इंदूबाई वाजेकर इंग्रजी माध्यमाचे सभापती व्ही.सी.म्हात्रे, वि.के.विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य व संकुल प्रमुख पी.बी ठाकूर, संकुलातील सर्व मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर बंधू-भगिनी उपस्थित होते.
18 डिसेंबर 1924 रोजी संस्थेने थोर शिक्षणकार डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या हस्ते आपला रौप्य महोत्सव साजरा केला त्याची आठवण म्हणून आजही 18 डिसेंबर हा दिवस संस्थेचा वर्धापन दिन म्हणून साजरा करण्यात येतो.