| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
कुलाबा जिल्हा लोकल बोर्डाचे पहिले उपाध्यक्ष, शेतीविषयक चळवळीचे प्रवर्तक, स्वातंत्र्य सैनिक, विद्यार्थीप्रिय शिक्षक तपस्वी रामजी लक्ष्मण घरत यांचा ७४ वा स्मृतीदिन त्यांच्या अर्धपुतळ्याला अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन साजरा करण्यात आला.
अलिबागेतील सार्वजनिक वाचनालयासमोरील सासवणेचे भूमीपूत्र, पाठारे क्षत्रिय ज्ञातीभूषण तपस्वी रामजी घरत अर्धपुतळा परिसराचे सुशोभिकरण प्रशांत नाईक मित्रमंडळाने केले आहे. तेथे दरवर्षी तपस्वी रामजी घरत यांचा स्मृतीदिन व जयंती या कार्यक्रमांचे आयोजन निमंत्रक श्रीरंग घरत व त्यांचे सहकारी करीत असतात. याही वर्षी शुक्रवार, १३ जानेवारी रोजी अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत तपस्वी रामजी लक्ष्मण घरत यांच्या ७४ व्या स्मृतीदिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी तपस्वी रामजी लक्ष्मण घरत यांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी या कार्यक्रमाचे आयोजक, ज्येष्ठ नागरिक संस्था भालनाकाचे अध्यक्ष श्रीरंग घरत यांनी तपस्वी रामजी लक्ष्मण घरत यांच्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली. तर आभार कोकणनामाचे निवासी संपादक शरद कोरडे यांनी मानले.
तपस्वी रामजी लक्ष्मण घरत यांची पणती साक्षी प्रसाद काठे, पूजा प्रसाद काठे, प्रसाद काठे, नागेश कुळकर्णी, उमाजी केळुसकर, भालचंद्र वर्तक, अरविंद घरत, विकास पाटील, शरद कोरडे, चारुशीला कोरडे, मधुकर पाटील, संजय कांबळे, हेमकांत सोनार, विनोद टेंबुलकर, जगदीश नागे, अॅड. के.डी. पाटील, अरुणकुमार धुळप, विठोबा म्हात्रे, कृष्णा म्हात्रे, सुदाम पाटील, अरुण पाटील, प्रतिम सुतार, पंकज घरत, श्रीकांत म्हात्रे, सुधाकर राणे, अंकीत म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.