इंग्लिश मिडीयमचे चिमुकले उत्सव साजरे

। पाली/बेणसे । वार्ताहर ।

जॅक अँड जिल इंग्लिश मिडीयम स्कूल पालीचे चिमुकले उत्सव थाटामाटात साजरे झाले. या कार्यक्रमानिमित्त विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनपर कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी चिमुकल्यांनी केलेल्या नृत्याविष्काराचे सादरीकरण थक्क करणारे होते. चिमुकले विद्यार्थ्यांची वेशभूषा त्यांचे धाडसी नृत्य सादरीकरण पाहून सर्वांनीच उत्स्फूर्त दाद देत कौतुक केले.

जॅक अँड जिल स्कुलमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासाह क्रीडा, नृत्य, संभाषण कौशल्य आदी सर्व बाबींचे प्रशिक्षण दिले जाते. संचालिका प्रभा द्रविड या विद्यार्थ्यांमधील सुप्त कला गुण त्यांची आवड ओळखून त्यांना भविष्यासाठी तयार करतात असे, मत रवींद्र लिमये यांनी व्यक्त केले.

यावेळी रवींद्र लिमये, शेकाप नेते सुरेश खैरे, नगरसेविका कल्याणी दपके, नगरसेवक विनायक जाधव, डॉ. मोरे, धम्मशील सावंत आदी मान्यवरांनी संचालिका प्रभा द्रविड, प्रणाली शेठ, सोनाली पाटील, हिना अमीन, अमृता कदम व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Exit mobile version