| पाली/बेणसे | वार्ताहर |
पाली शहरात जैन बांधवांच्यावतीने रविवारी (दि. 21) भगवान महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी पाली शहरातून भगवान महावीर जैन स्वामींचा वाजत गाजत वरघोडा काढण्यात आला. या वरघोड्यावेळी जैन बंधू भगिनी लहानगे मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.
येथील महावीर जैन मंदिरामध्ये भगवान महावीर जैन यांची पूजा करण्यात आली. तसेच येथील महावीर चौक नाम फलकाला पुष्पहार घालण्यात आला. इतर धर्मियांनी देखील भगवान महावीर जयंतीच्या शुभेच्छा जैन बंधू-भगिनींना दिल्या. यावेळी गीता पालरेचा, जैन समाज अध्यक्ष सुभाषशेठ ओसवाल, उपाध्यक्ष इंदरशेठ परमार, महेंदर जैन, प्रकाश पालरेचा, अमृत भंडारी, सोहन ओसवाल, अशोक ओसवाल, आवाज जैन, भूषण राठोड, अंकित जैन, रुपेश जैन, स्वप्निल ओसवाल, राज ओसवाल यांच्यासह सर्व सभासद व सदस्य सहभागी झाले होते.