| वाघ्रण | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वाघ्रणच्या इमारतीचे भूमिपूजन शुक्रवारी (दि.24) पार पडले. शेतकरी कामगार पक्षाच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या प्रयत्नाने आणि मार्गदर्शनाने हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी अलिबाग पंचायत समितीचे माजी उपसभापती अनिल पाटील, सरपंच राजेंद्र पाटील, शेकापचे ज्येष्ठ कार्यकर्ते आर.बी. पाटील, आत्माराम पाटील, अविनाश म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य हरीश्चंद्र पाटील, सदस्या सुप्रिया पाटील, पुष्पलता पाटील व कार्यकर्ते राजू पाटील आदींच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी व्यासपीठाचे देखील आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख अतिथी आणि कार्यकर्त्यांचे स्वागत सरपंच राजेंद्र पाटील यांनी केले. तर, प्रास्तावीक वाघ्रण ग्रामपंचायतीचे माजी सदस्य दिपक पाटील यांनी केले. यावेळी शेकापकडून झालेली विकास कामे, सत्ता नसतानाही काम करण्याची पद्धत अन् वेग आणि विकास कामांबाबतची दूरदृष्टी या बाबत चित्रलेखा पाटील यांची स्तुती करण्यात आली. तसेच, त्यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर प्रमुख अतिथी अनिल गोमा पाटील यांनी शेकापच्या माध्यमातून वाघ्रण-खारपेढांबेमध्ये झालेल्या विकासावर भाष्य केले. तसेच, शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी सोडवलेल्या पिण्याच्या पाण्याच्या समस्ये बाबत सविस्तर विचार मांडले. या कार्यक्रमाला दीपक पाटील, अभिषेक पाटील, ग्रामपंचायत अधिकारी सुवर्णा पाटील, सदस्य रुपेश पाटील, नितीन पाटील, हरिश्चंद्र भाईर, दशरथ पाटील, बळवंत गावंड, रविकीरण पाटील, एच.एन. पाटील, गिरीश पाटील आदींसह शेकाप कार्यकर्ते, महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.







