सण साजरा करणे, हा कुटुंबांना जोडण्याचा उद्देश

। नवी मुंबई । प्रतिनिधी ।

आजचे जग एकमेकांशी जोडले गेले आहे आणि अशा जगात चांगल्या शैक्षणिक संधी शोधण्यासाठी, कारकिर्दीत वाढ करण्यासाठी किंवा उत्तम दर्जाचे आयुष्य जगता यावे म्हणून लोकं भिन्न प्रदेशात स्थलांतर करत आहेत. याचा परिणामस्वरूप, अनेकदा सणासुदीच्या दिवसांमध्ये कुटुंबे एकमेकांपासून लांब असल्याने त्यांना एकत्र उत्सव साजरा करता येत नाही. रक्षाबंधन हा सण कुटुंबांना एकत्र आणून भावंडांमध्ये असलेल्या प्रेमाचा व संरक्षणाच्या बंधाचा उत्सव साजरा करतो आणि त्या नात्याचा मान राखतो. राखी एक्स्प्रेसच्या माध्यमातून सण साजरा करणार्‍या कुटुंबांना जोडण्याचा उद्देश डीएचएल एक्स्प्रेसने ठेवले आहे. डीएचएल एक्स्प्रेस ही आंतरराष्ट्रीय एक्स्प्रेस सेवेतील एक जागतिक आघाडीची कंपनी आहे आणि किरकोळ (रिटेल) ग्राहकांना खास ऑफर्स व सवलती देऊन रक्षाबंधनाच्या आनंदात भर घालत आहे. या सवलती 19 ऑगस्ट 2024 पर्यंत वैध असून ग्राहकांना जागतिक स्तरावर 0.5 किलो ते 20 किलोपर्यंतच्या राख्या आणि भेटवस्तूंच्या शिपमेंट्स पाठविण्यासाठी सवलतींचा लाभ घेता येईल. डीएचएल च्या देशभरातील 700 हून अधिक किरकोळ सेवा केंद्र आहेत.

Exit mobile version