| कल्याण | प्रतिनिधी |
महावितरणच्या कल्याण परिमंडळात भारतीय प्रजासत्ताकाचा 75वा वर्धापन दिन शुक्रवारी (दि. 26) मोठ्या उत्साहात साजरा झाला. कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर राज्यघटनेच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच शिष्यवृत्तीधारक गुणवंत पाल्य आणि त्यांच्या पालक कर्मचार्यांचा मुख्य अभियंता श्री. औंढेकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी कल्याण मंडळ एकचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील, कल्याण मंडळ दोनचे अधीक्षक अभियंता दिलीप भोळे, पायाभूत आराखडा विभागाचे अधीक्षक अभियंता महेश अंचिनमाने, सहाय्यक महाव्यवस्थापक धैर्यशिल गायकवाड, अधिकारी, अभियंते, कर्मचारी उपस्थित होते.