सह्याद्री स्कूलमध्ये मराठी राजभाषा दिन साजरा

। खोपोली । प्रतिनिधी ।

खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या सह्याद्री इंग्लिश स्कूलमध्ये कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस ‘मराठी राजभाषा दिन’ म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी पोवाडे, कविता, ओव्या, प्रार्थना आणि नृत्य सादर केले. तसेच, शिक्षकांनी भगवे फेटे तर मुलींनी नऊवारी साडी, मुलांनी कुर्ते परिधान केले होते. याप्रसंगी मुख्याध्यापिका धनश्री भोईर ठकेकर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, इंग्रजी माध्यमच्या शाळेतील मुले असूनही सर्वजण किती अस्खलित मराठी बोलत आहेत याचा आनंद वाटला. एकंदरीत आजचा मराठी राजभाषा दिन हा विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची गोडी वाढवण्यासाठी नवी ऊर्जा देण्यासाठी असल्याचेही सांगत मराठी भाषा दिनानिमित्ताने शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version