रोह्यामध्ये रोटरीचा वर्धापनदिन साजरा

| नागोठणे | वार्ताहर |

रोटरी इंटरनॅशनलचा 118 वा वर्धापन दिन सोहळा रोहा येथील शेडगे यांच्या वनश्री या फार्म हाऊसवर नुकताच मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. रोटरी क्लबच्या रोहा सॅटॅलाइट क्लब नागोठणे, माणगाव, गोरेगाव, महाड, रायगड फोर्ट व या क्लबचे सदस्य यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी विविध कार्यक्रमाचे व सप्तसुर मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रामाच्या निमित्ताने कोकणातील प्रसिद्ध पोपटी पार्टी व जेवणाचा आस्वाद सगळ्या रोटरी सदस्यांनी घेतला. या कार्यक्रमाला रोटरियन्स असलेले जिल्ह्यातील वेगवेगळ्या उच्च पदावर काम करणारे अधिकारी, नामांकित डॉक्टर, राजकीय पुढारी, महिला व मुले मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सुरुवातीला उपस्थित सर्व क्लबच्या अध्यक्षांनी केक कापून कार्यक्रमाची सुरुवात केली व रोटरी क्लबच्या माध्यमातून संघटितपणे रायगड जिल्ह्यात चांगली समाजसेवा करण्याचा अभिवचन एकमेकांना दिला. यानंतर वेगवेगळ्या मनोरंजनाचे कार्यक्रमही घेण्यात आले. प्रिझम ऑर्केस्ट्राचे जयवंत मोरे यांनी आपल्या मिमिक्रीने सगळ्यांना हसवत ठेवले. या कार्यक्रमाच्या दरम्यान समीर शेडगे तसेच स्वप्निल परांजपे, पत्रकार सागर जैन व नागोठने भाजपचे व रोटरी क्लबचे अध्यक्ष सचिन मोदी यांना सम्मान चिन्ह देऊन त्यांनी केलेल्या विशेष सहकार्याबद्दल गौरवण्यात आले. सप्तसुरांची मैफिल मध्ये उमाळे सर यांनी खुपच चांगले गायन केले. गोरेगावचे ज्येष्ठ रोटरीन डॉक्टर गोखले व माणगावचे सुप्रसिद्ध डोळ्यांचे सर्जन डॉक्टर वैद्य यांनीही आपल्यातील कलाकाराले जगे करून सुमधूर गीते सादर केली त्याला प्रेक्षकांनी भरपूर दाद दिली. इतर रोटरी सदस्यांनीही वेगवेगळी गाणी गाऊन सगळ्यांचे मनोरंजन केले. सिमरन जैन यांनी सादर केलेल्या लावणी वर तर उपस्थित प्रेक्षक भारूवून गेले. शेवटी सगळ्याच रोटरी सदस्यांनी नृत्याचा ठेका धरून कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने वैद्यकीय, राजकीय, प्रशासकीय उच्च पदावर काम करणा-या जिल्ह्यातील व्यक्ती, व्यापारी एकत्र आल्यामुळे त्यांच्यातील मैत्री व स्नेह संबंध वाढतात असे नागोठणे सॅटॅलाइट क्लबचे अध्यक्ष सचिन मोदी यांनी सांगितले. रोटरीच्या मूळ उद्देश समाजसेवा असला तरी एकमेकांसोबत मैत्री घट्ट झाल्याने समाजसेवा अधिक संघटितपणे व प्रभावीपणे करता येते असेही त्यांनी स्पष्ट केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विक्रम जैन, अध्यक्ष सुरेंद्र निंबाळकर, विदुला परांजपे, सचिन शेडगे यांनी विशेष मेहनत घेतली.

Exit mobile version