वेदक कॉलेजचा वर्धापन दिन साजरा

। तळे । वार्ताहर ।

जी. एम. वेदक कॉलेज ऑफ सायन्स तळाचा वर्धापन दिन सोमवारी (दि.5) महाविद्यालय विकास समितीचे जेष्ठ सदस्य मा. श्री पुरुषोत्तम मुळे यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्षीय भाषणात पुरुषोत्तम मुळे यांनी मौल्यवान मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच, त्यांनी महाविद्यालयाच्या आतापर्यंतचा प्रवास विषद करताना गोपीनाथ महादेव वेदक प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिक्षणमहर्षी मा. डॉ. नंदकुमारजी वेदक व सचिव मा. उन्मेशजी वेदक यांचे आभार मानून त्यांच्या सततच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या झालेल्या प्रगतीवर प्रकाश टाकला.

या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. पी.बी.अभंगे यांनी केले.

Exit mobile version