तपस्वी रामजी लक्ष्मण घरत यांची जयंती साजरी

अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील आवास येथील मूळ निवासी आणि पाठारे क्षत्रिय समाजातील थोर विभूती तपस्वी रामजी लक्ष्मण घरत यांच्या 166 व्या जयंतीनिमित्ताने बुधवारी (दि. 23) सार्वजनिक वाचनालय व जिल्हा ग्रंथालयाचे अध्यक्ष, अलिबागचे नगरसेवक अ‍ॅड. गौतम पाटील, संयोजन समितीचे प्रमुख श्रीरंग घरत यांच्या प्रमुख उपस्थितीत अलिबागचे नगराध्यतक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते तपस्वी रामजी लक्ष्मण घरत यांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.

सार्वजनिक वाचनालय, अलिबाग समोरील तपस्वी रामजी लक्ष्मण घरत यांच्या पुतळा परिसराचे सुशोभिकरण प्रशांत नाईक मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. तपस्वी रामजी लक्ष्मण घरत यांच्या जयंतीनिमित्ताने दरवर्षी त्यांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात येतो. याही हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सार्वजनिक वाचनालय व जिल्हा ग्रंथालयाचे अध्यक्ष, अलिबागचे नगरसेवक अ‍ॅड. गौतम पाटील हे उपस्थित हे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते याप्रसंगी श्रीफळ वाढविण्यात आला, तर तपस्वी रामजी लक्ष्मण घरत यांच्या माहितीफलकास श्रीरंग घरत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

या जयंती समारंभास बळवंत वालेकर, उमाजी केळुसकर, नागेश कुळकर्णी, अरविंद घरत, भालचंद्र वर्तक, नवीन राऊत, शरद कोरडे, चारुशीला कोरडे, विकास पाटील, सुधाकर घरत, कमळाकर राऊत, सुभाष घरत, संजय कांबळे आदी उपस्थित होते.

Exit mobile version