| पनवेल | वार्ताहर |
स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष दिवंगत मनोज भाई संसारे यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी महेश साळुंखे यांनी आगामी राजकीय भूमिकेविषयी स्पष्ट करताना सांगितले की आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये रायगड रत्नागिरी मतदारसंघ व मावळ मतदार संघामध्ये स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाची चांगली ताकद आहे. आणि आजपर्यंत महायुती किंवा महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांपैकी कोणीही स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीच्या जिल्हाध्यक्षांशी संपर्क केलेला नाही. महाविकास आघाडी उमेदवारांसमोर वंचित बहुजन आघाडीचा तगडा विरोध असताना जर आंबेडकरी चळवळीतल्या घटक पक्षांची व त्यांच्या नेत्यांशी संपर्क साधला नाही तर त्याचा फटका या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारे बसू शकतो.
त्यामुळे दोन्ही घटक पक्षांनी लवकरात लवकर स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांबरोबर लवकरात लवकर चर्चा करावी जेणेकरून योग्य ती भूमिका घेऊन पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करता येईल. मनोज संसारे यांना मानणारे महाराष्ट्रभर कार्यकर्ते आहेत आणि या सर्व कार्यकर्त्यांची महेश साळुंखे यांचा जवळचा संपर्क आहे त्यामुळे त्याचा फायदा हा उमेदवारांना होऊ शकतो. जर लवकरात लवकर महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संपर्क साधला नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यात येऊ शकतो असा निर्णय रायगड रत्नागिरी मावळ मतदार संघामध्ये महेश साळुंखे यांनी पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून हा निर्णय घेतलेला आहे. त्याचबरोबर सर्व कार्यकर्त्यांना व उमेदवारांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा महेश साळुंखे यांनी दिलेले आहेत.
मनोज संसारे यांची जयंती साजरी
