| पनवेल | वार्ताहर |
स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली महाड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाचा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यकर्त्यांचा स्वाभिमानी मेळावा सोमवार (दि.16) रोजी दुपारी दोन वाजता संपन्न होणार आहे.
या मेळाव्याचे आयोजन महाड तालुका अध्यक्ष सुजित जाधव व महाड शहराध्यक्ष सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. या मेळाव्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सागर भाई संसारे, महाराष्ट्र प्रदेशचे युवा नेते अनिकेत संसारे, महासचिव अशोकजी वाघमारे, अरुण धीवर, मुंबई प्रदेशचे अध्यक्ष अमित हिरवे, विजय पवार, सिद्धार्थ पेडणेकर व महाराष्ट्राचे संघटक भगवान गरुड उपस्थित राहणार आहेत. हा मेळावा जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांच्या संकल्पनेतून घेण्यात येत आहे. या मेळाव्यासाठी रायगड जिल्हा कार्याध्यक्ष विजय धोत्रे त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे अध्यक्ष, शहरांचे अध्यक्ष व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. रायगड जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांना महेश साळुंखे यांनी आवाहन केले आहे की त्यांनी या मेळाव्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे. हा मेळावा सोमवार दि.16 रोजी दुपारी दोन वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन चवदार तळे महाड येथे संपन्न होणार आहे.