। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव तालुक्यातील निजामपूर येथे महाराष्ट्र दिनी जिनियस मैत्रकुल, विद्यार्थी भारती, मराठी भारती आयोजित महाराष्ट्राशी संस्कृतीशी कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला. आपल्या या कार्यक्रमामध्ये विविध प्रकारचे नृत्याचे सादरीकरणामध्ये वाघ्या मुरळी, लावणी, आदिवासी नृत्य अशा प्रकारच्या विविध कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नृत्य दिग्दर्शक सदानंद राणे, शाहीर दत्ताराम म्हात्रे उपस्थित होते. तसेच अनेक प्रमुख पाहुण्यांनी उपस्थिती लावली.
अनेक मान्यवरांच्या कार्याचा आढावा घेत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते आकाश तायडे (गार्गी) यांच्या लावणीने. या कार्यक्रमात अनेक नवीन विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली.







