उंबरखिंड विजय दिन साजरा

| पाताळगंगा | वार्ताहर |

ऐतिहासिक वारसा असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे सहकारी सरनौबत नेताजी पालकर यांचे उंबरखिंड हे जन्म गाव म्हणून प्रसिध्द आहे. या इतिहासकालीन असलेले चौक गावामधून भव्य अशी मशाल ज्योत प्रज्योलित करण्यात आली होती. सरनौबत नेताजी पालकर यांनी कारतलबखान व महिला सरदार रायबाधन यांच्या 30 हजार फौजेवर समरभुमी उंबरखिंड येथे मोजक्या मावळ्यांसह 2 फेब्रुवारी 1661 रोजी विजय मिळवला. छत्रपती शिवरायांनी ज्या 27 महत्वपुर्ण लढायांमध्ये भाग घेतला होता, त्यापैकी ही एक लढाई होती. म्हणून दरवर्षी छावणी येथे ग्रूप ग्रामपंचायत व ग्रामस्थ चावणी पंचायत समिती खालापूर, रायगड जिल्हा परिषद, शिवदुर्ग मित्र मंडळ लोणावळा यांच्या वतीने विजय दिवस साजरा करण्यात येतो. यावर्षी 363 वा विजय दिन सोहळा आहे. यावेळी शाळेय विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा उजाळा देत शिस्तबद्ध आणि पारंपारिक खेळाबरोबर विविध कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले होते.

Exit mobile version