। पाताळगंगा । वार्ताहर ।
ऐतिहासिक वारसा असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे सहकारी सरनौबत नेताजी पालकर यांचे हे जन्म गाव म्हणून प्रसिध्द आहे. दरवर्षीप्रमाणे नेताजी पालकर मंडळ, चौक यांच्या माध्यमातून समरभूमी उंबरखिंड विजय दिनानिमित्ताने जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 364 वा उंबरखिंड विजयदिन (2 फेब्रु 2025) निमित्ताने जिल्हास्तरीय खुल्या निबंध स्पर्धेमध्ये शिवशाहीतील ऐतिहासिक स्थळे, चौक व उंबरखिंड व त्यांच्या परिसराचे इतिहासातील महत्व असे विषय असून शब्दमर्यादा 1000 ते 1500 असणार आहे. तसेच इ.6वी ते 10 वी यांसाठी छत्रपती शिवरायांचे हेर बहिर्जी नाईक व त्यांचे स्वराज्यातील योगदान असे विषय आहेत. शब्द मर्यादा 500 ते 600 शब्द. स्पर्धकांना प्रमाणपत्र, तसेच पहिल्या पाच क्रमांकांना स्मृतिचिन्ह व पुस्तक स्वरूपात बक्षिसे दिली जातील. निबंध 10 फेब्रु. 2025 पर्यंत पाठवावेत. तसेच गुणगौरव दि.27 फेब्रु 2025 रोजी चौक येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होईल. निबंध स्पर्धाप्रमुख भुषण पिंगळे (9326667459) संघटक यशवंत सकपाळ रायगड भूषण (9326153737) यांना पाठविण्यांचे आवाहन करण्यात आले आहे.