जागतिक पुस्तक दिन साजरा

| अलिबाग | प्रतिनिधी |

प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालय अलिबाग तसेच प्रभाकर पाटील सांस्कृतिक मंचातर्फे प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालय राम-नारायण पत्रकार भवन येथे रविवार, दि.23 एप्रिल रोजी जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून पुस्तकाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.

कार्यक्रमात रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष तसेच ग्रंथमित्र पुरस्कार प्राप्त व रायगड जिल्हा ग्रंथालय संघाचे मार्गदर्शक नागेश कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी पुस्तकाचे महत्त्व विशद करणारी कविता कोमसाप अलिबाग शाखेचे सहकार्यवाह नंदु तळकर यांनी उपस्थितांसमोर सादर केले. यावेळी उमेश करंबत, हेमकांत सोनार आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांचे आभार हेमकांत सोनार यांनी मानले.

Exit mobile version