जागतिक वन दिन साजरा

। मुरुड-जंजिरा । प्रतिनिधी ।

सामाजिक वनीकरण विभागामार्फत गरूवारी (दि.21) जागतिक वन दिनानिमित्ताने अशोक लोखंडे विद्यामंदिर पीटसई हायस्कूल येथे विविध कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला. सामाजिक वनीकरणातील सर्व अधिकारी वर्गांनी या हायस्कूलला भेट देऊन त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना वनाचे महत्व व संपूर्ण जगात वन क्षेत्र वाढवून ते वृद्धिगत करण्यावर भर देत असल्याची माहिती देण्यात आली.

यावेळी शालेय विद्यार्थ्यांना वृक्ष प्रतिज्ञा व पर्यावरण प्रतिज्ञासाठी शपथ देण्यात आली. सामाजिक वन विभागाचे वनपाल प्रमोद बागल यांनी विद्यार्थ्यांना माहिती देताना सांगितले की, संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक वन दिन साजरा करण्याचे निर्देश दिल्यापासून संपूर्ण जगात वन दिन साजरा होत असतो. भारताच्या एकूण भू भागांपैकी 33 टक्के वन क्षेत्र आरक्षित असणे खूप आवश्यक आहे. वनामध्ये औषिधी बरोबरच वन्यजीव सुरक्षित रहात असतात. वृक्षांचे व वन्यजीवांचे रक्षण होण्यासाठी वृक्ष लागवड जास्तीती जास्त करणे खूप आवश्यक आहे. पावसाळ्यापूर्वी वृक्ष लागवड करा व वृक्षाची जोपासना करणे खूप महत्वाचे आहे. होळीसाठी जिवंत झाडे तोडू नये असे आवाहनसुद्धा यावेळी त्यांनी केले.

कार्यक्रमाला वनपाल शरद धायगुडे, वनरक्षक प्रतिभा जलदावार, संतोष रेडीज, अरुण खुळपे, सुप्रिया रेडीज, रेखा रेडीज, नीलम गोळे, संजय ठमके, अकील मुलाणी, भागीनाथ बांगर, संदीप इनगावले, सुनील तेलंगे, एकनाथ कोळी, दीपक भोसले, बबन जगताप, रमण महाडिक, कोंडीराम हिरवे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version