| अलिबाग | प्रतिनिधी |
जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे 2 ते 9 मार्च या कालावधीमध्ये कर्णबधिरता सप्ताह साजरा करण्यात येत आहे. सप्ताहाचा शनिवारी (दि.2) शुभारंभ अति. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शितल जोशी-घुगे, तसेच निवासी वैदयकिय अधिकारी डॉ. आशिष मिश्रा, कान /नाक/ घसा तज्ञ डॉ. हर्ष गुजराथी व डॉ. हरिष आर. यांच्या हस्ते करण्यात आला. सोमवारी (दि. 4) शालेय विद्यार्थ्यांची कर्णबधिरता जनजागृती रॅली काढण्यात आली. या सप्ताह अंतर्गत विविध ठिकाणी श्रवण, वाचा, कान /नाक/घसा तपासणी तसेच, दिव्यांग प्रमाणपत्र वितरण व श्रवण यंत्रांचे वाटप देखील करण्यात येत आहेत. तरी जास्तीत जास्त रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांनी केले आहे. सदर सप्ताह यशस्वी होण्यासाठी ऑडिओलॉजिस्ट ऋषिकेश देशमुख व स्पीच थेरपिस्ट समाधान चौधरी यांनी विशेष मेहनत घेतली आहे.