। अलिबाग । प्रतिनिधी ।
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून अलिबाग ज्येष्ठ नागरिक संस्थेने मंगळवारी (दि.1) संस्थेच्या सभागृहात ‘ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार व कर्तव्य’ या विषयावर लायन्स क्लब श्रीबाग सेंटिअलचे अध्यक्ष अॅड. के.डी. पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल राऊत, उपाध्यक्ष चारुशीला कोरडे, गजेंद्र दळी, द्वारकानाथ नाईक, राजाराम बने, आर. के. घरत, शरद कोरडे, राजाराम भगत आदींसह ज्येष्ठ नागरिक संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या व्याख्यानात अॅड. के.डी. पाटील यांनी ज्येष्ठ नागरिकांना आपल्यामागे शासन व न्यायालयही ठामपणे उभे असून त्यांनी ज्येष्ठांच्या सुरक्षिततेसाठी व त्यांना सन्मानाने जगता यावे, यासाठी विविध कायदे केले असून त्यांचा फायदा त्यांना उतार वयात येणार्या समस्या सोडविण्यासाठी होत आहे, असे सांगून ज्येष्ठांनीही आपले कर्तव्य कसे पार पाडावे, आपल्या कुटुंबात व समाजात आपल्या ज्ञानाचा व अनुभवाचा फायदा कसा करून द्यावा व आपले व इतरांचे जीवन आनंदमय कसे करावे याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले.







