| उरण | वार्ताहर |
आत्माराम ठाकूर मिशन संचालित जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल, आवरे, ता.उरण या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत बाळ आनंदमेळावा साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन शिक्षक-पालक संघटनेच्या अध्यक्षा शुभांगी पाटील यांनी केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अशोक ठाकूर, शिक्षक-पालक संघटनेचे सदस्य प्रदीप वर्तक, विश्रांती म्हात्रे उपस्थित होते. या बाळ मेळाव्यात पहिली ते दहावी विद्यार्थ्यांनी एकूण 30 दुकाने मांडली होते. यामध्ये प्रथम क्रमांक दहावीच्या विद्यार्थ्यांनी गौरी गावंड, मनस्वी गावंड, प्रियांशी म्हात्रे, आर्या गावंड, अनघा पाटील, श्रुती म्हात्रे, सानिया गावंड यांनी पटकावला तर द्वितीय व तृतीय क्रमांक इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी ध्रुवी गावंड, मृणाली म्हात्रे व इयत्ता पाचवीचा विद्यार्थी ध्वेन म्हात्रे यांनी पटकावला. उत्तेजनार्थ शमिका म्हात्रे हिने मिळवला. या बाळ मेळाव्यात विविध खेळ घेण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी मेहनत घेतली.







