। अलिबाग । वार्ताहर ।
लायन्स क्लब अलिबागच्या सभागृहात प्रजापिता ब्रम्हाकुमारी केंद्राकडून महाशिवरात्र उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शिव बाबा यांच्या नावे पाहुण्यांच्या हस्ते केक कापण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून रायगड जिल्हा परिषद सदस्या चित्रा पाटील यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. या कार्यक्रमाला रायगड भूषण जयपाल पाटील, रायगड भूषण अॅड.के.डी.पाटील, अॅड,भुपेंद्र पाटील उपस्थित होते. सदर कार्यक्रमाची प्रस्तावना भारती दीदी व सूत्रसंचालन अंजूदीदी यांनी केले. यावेळी उपस्थितांना चित्रा पाटील, अॅड.के.डी.पाटील यांनी मार्गदर्शन केले, अॅड.भुपेंद्र पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.







