वाघोडे येथे राष्ट्रीय बालिका दिन साजरा

। कुसुंबळे । वार्ताहर ।
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प अलिबाग अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या चिखली विभाग तसेच तेजस्विनी सामाजिक व सांस्कृतिक फाउंडेशन अलिबाग रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यवेक्षिका भाग्यश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच वाघोडे येथे राष्ट्रीय बालिका दिवस मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यात आला. यावेळी 3 वर्षे ते 18 वर्षे वयोगटातील बालिकांना अंगणवाडीमध्ये बोलावून अंगणवाडी सेविकांच्या शुभहस्ते त्यांचे औक्षण करण्यात आले तसेच पर्यवेक्षिका भाग्यश्री पाटील व तेजस्विनी सामाजिक व सांस्कृतिक फाउंडेशन अलिबाग संस्थापिका जिविता पाटील यांच्या शुभहस्ते त्यांना गुलाब पुष्प, राजगिरा लाडू व चिक्की देवून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी पर्यवेक्षिका भाग्यश्री पाटील यांनी मुलींना व उपस्थित अंगणवाडी सेविकांना बालिका दिवसानिमित्त मार्गदर्शन करीत असताना बालकांसाठी असणाऱ्या व कोविड कालावधीत येवू घातलेल्या नवनवीन विविध योजनांची माहिती दिली. यावेळी उपस्थित बालिकांना गोड जेवण देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निशा कदम यांनी केले तर आभार प्रदर्शन वाघोडे अंगणवाडी सेविका मानिनी कदम यांनी केले.

Exit mobile version