तपस्वी रामजी लक्ष्मण घरत यांची पुण्यतिथी साजरी

। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
कुलाबा जिल्हा लोकल बोर्डाचे पहिले उपाध्यक्ष, शेतीविषयक चळवळीचे प्रवर्तक, स्वातंत्र्य सैनिक, विद्यार्थीप्रिय शिक्षक तपस्वी रामजी लक्ष्मण घरत यांची 72 वी पुण्यतिथी त्यांच्या अर्धपुतळ्याला अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन त्यांना आदरांजली वाहण्यात आली. अलिबागेतील सार्वजनिक वाचनालयासमोरील सासवणेचे भूमीपूत्र, पाठारे क्षत्रिय ज्ञातीभूषण तपस्वी रामजी घरत अर्धपुतळा परिसराचे सुशोभिकरण प्रशांत नाईक मित्रमंडळाने केले आहे. तेथे दरवर्षी तपस्वी रामजी घरत यांचा स्मृतीदिन व जयंती या कार्यक्रमांचे आयोजन निमंत्रक श्रीरंग घरत व त्यांचे सहकारी करीत असतात. याही वर्षी गुरुवार, 13 जानेवारी रोजी अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत तपस्वी रामजी लक्ष्मण घरत यांच्या 72 व्या स्मृतीदिनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक, ज्येष्ठ नागरिक संस्था भालनाकाचे अध्यक्ष श्रीरंग घरत, राजिम पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुळकर्णी, साहित्यिक उमाजी केळुसकर, आरडीसी बँकेचे मुख्याधिकारी प्रदीप नाईक, अनिल चोपडा, प्रा. पंकज घरत, निलेश नाईक, नवीन राऊत, भालचंद्र वर्तक, विकास पाटील, साहित्यिक शरद कोरडे, चारुशिला कोरडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version