संत रोहिदास जयंती साजरी

। कोर्लई । वार्ताहर ।

रोहिदास समाज पंचायत संघ मुंबई यांच्या विभाग समिती क्रमांक 8 कुर्ला यांच्यातर्फे कुर्ला नेहरू नगर येथे प्रबोधनकार ठाकरे सभागृहात होळी सणाचे औचित्य साधून संत रोहिदास जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली.

याप्रसंगी गणेश विठ्ठल चव्हाण, संतोष तुकाराम गोठणकर, छगन शिवराम खेडेकर, साक्षी संजय जानवलकर, ज्योती दिपक पाटणकर, डॉ. सुभाष रामचंद्र सोनंदकर आणि शशिकांत राजाराम सावंत आदी मान्यवर, समाज बांधव व विशेष करून महिला यावेळी उपस्थित होत्या. यावेळी विशेष सत्कार म्हणून क्रीडारत्न बळीराम सुसवीरकर यांना सन्मानपत्र देऊन त्यांचा विशेष जाहीर सत्कार करण्यात आला.

Exit mobile version