टीएमसी कॉलेजमध्ये योगदिन साजरा

। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव येथील जे.बी. सावंत एज्युकेशन सोसायटीचे टिकमभाई मेथा कॉमर्स कॉलेजमध्ये मंगळवार, दि.21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला. सर्वप्रथम प्रा. हर्षल जोशी यांनी योग दिनाची पार्श्‍वभूमी मुलांना सांगितली. त्यानंतर मानवी जीवनात योगाचे महत्त्व उदाहरणांसह पटवून दिले.

त्यानंतर व्यायामाचे विविध प्रकार मुलांना शिकविले व मुलांकडून ते करून घेतले. तसेच प्राणायाम, कपालभारती, भ्रामरी, अनुलोप विलोप ओमकार व ध्यान साधना यांविषयी माहिती देऊन प्रात्यक्षिकांद्वारे करून घेतले. तसेच विविध आसनांविषयी माहिती दिली. फक्त आजच्या दिवशीच योगा न करता दररोज कॉलेजला येण्यापूर्वी रोज अर्धा तास योगा केल्यास सकारात्मक परिणाम दिसेल, असे जोशी सरांनी सांगितले. या कार्यक्रमात एकूण 59 मुले व मुली सहभागी झाले होते. तसेच 12 शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. डॉ.प्रा. चंद्रकांत माळी, प्रा. अशोक मोरे, ग्रंथपाल अमित बाकाडे, दिलीप ढेपे, भारत पवार, दिनेश कुळे व दिलीप बक्कम यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Exit mobile version