लॉजिस्टीक पॉलिसीला केंद्राची मंजुरी

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि.21) केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक झाली. आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला चालना देण्यासाठी तीन निर्णय यावेळी घेण्यात आले. यामध्ये उच्च कार्यक्षमता सोलर पीव्ही मॉड्यूल ट्रान्स-2 साठी योजनेला मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले की, उच्च कार्यक्षमता सोलर पीव्ही मॉड्यूल ट्रान्स-2 साठी 19,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 14 भागात पीएलआय योजना आणली जाणार आहे. या योजनेमुळे देशात सौर पॅनेलच्या निर्मितीला चालना मिळणार आहे. याशिवाय बैठकीत मंत्रिमंडळाने सेमीकंडक्टर्स आणि डिस्प्ले मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टमच्या विकासासाठी कार्यक्रमातील सुधारणांनाही मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.

Exit mobile version