| मुंबई | प्रतिनिधी |
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा भारताला प्रगतीकडे गतीमानतेकडे घेऊन जाणारा असल्याची प्रतिक्रिया अर्थतज्ज्ञ शर्मिष्ठा पाडळीकर दिवेकर यांनी व्यक्त केली आहे.
या संदर्भात त्यांनी म्हटले आहे की, अर्थसंकल्पाच्या सकारात्मक बाजूकडे पाहिले तर गेल्या 8 वर्षापेक्षा 2023 च्या बजेटमध्ये आयकरकायद्यामध्ये सर्वाधिक सुधारणा करून लोकसभे ठेवण्यांत आल्या आहेत. त्यामध्ये एकूण 122 सुधारणांचा समावेश आहे. त्यामुळे आयकरामध्ये मोठ्या प्रमाणात सूट मिळणार असून त्याची पूर्तता करण्यासाठी सोपे होणार आहे. आयकर प्रकियेचा वेळ हा 24 तास ते 16 दिवसांवर कमी करण्यात आला आहे. त्यामुळे ज्यांचे आयकर विवरण पत्रक सर्व तरतुदींचा विचार करून बरोबर भरणा केले असेल त्यांना रिफंड 24 तासात मिळू शकतो, असेही मत पाडळीकर यांनी व्यक्त केले आहे.
आयकर स्तरामध्ये बदल करण्यात आलेला आहे. त्याचा फायदा मध्यमवर्गीयांना होईल व 7 लाखापर्यंत उत्पन्न असणार्याना आयकर भरवा लागणार नाही . व्यवसाय उद्योंगाना डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना आयकर मध्ये जास्त सूट देण्यात आली आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.
नकारात्मक बाजूबाबत बोलताना त्यांनी ज्यांचे वार्षिक उत्पन्न 15 लाखापेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी निराशाजनक आहे कारण त्यांना अतिरिक्त नविन वजावट काहीच नाही. बचतीची मर्यादा न वाढल्यामुळे बचतीला चालना मिळणार नाही. मध्यमवर्गीय, व्यावसाईक यांच्यासाठी सकारात्मक आहे. तर उच्चवर्गीयांना विशेष सकारात्मक नाही, असे नमूद केलेले आहे.