प्रवाशांवर ट्रॅकवरुन पायपीट करण्याची वेळ, वाहतूक अर्धा तास उशीराने
| मुंबई | वृत्तसंस्था |
सलग तिसऱ्या दिवशी मध्य रेल्वेची रखडपट्टी झाल्याने प्रवाशांना रेल्वे ट्रॅकव्हर उतरून चालत जावे लागत आहे. साधारणतः ओव्हर हेड वायरवर बांबू पडल्याने सीएसएमटीकडे जाणाऱ्या सर्व फास्ट लोकल माटुंग्याला खोळंबलेल्या. सर्व लोकल एकापाठोपाठ एक थांबल्या होत्या. एवढेच नाहीतर काही एक्सप्रेस गाड्याही थांबल्याचे पाहायला मिळाले होते. वेळत ऑफिस गाठण्यासाठी लोकलमधील प्रवाशांनी ट्रॅकवर उतरून चालायला सुरूवात केली.
माटुंगा स्टेशननजिक एक कन्स्ट्रक्शन साईट आहे. या कन्स्ट्रक्शनसाठी काही बांबू वापरण्यात आले आहेत. त्यापैकीच काही बांबू रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर कोसळले. त्यामुळे रेल्वेचा खोळंबा झाला. या घटनेमुळे मोठा अपघात होता होता राहिल्याचंही बोलंल जात आहे. सध्या ओव्हरहेड वायरवरील बांबू दूर करण्यात यश आलं असलं तरीदेखील, प्रवाशांचा मोठा खोळंबा झाल्याचे पाहायला मिळत आहे. अजूनही रेल्वेसेवा विस्तळीत असून रेल्वेचे वेळापत्रक कोलमडल्याचे पाहायला मिळत आहे.