छ. संभाजी किंग्सचा तिसरा विजय

| पुणे | प्रतिनिधी |

पुणे महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्यावतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत आठव्या दिवशी पहिल्या लढतीत दिग्विजय पाटील (नाबाद 48) व दिग्विजय जाधव (नाबाद 20) यांनी केलेल्या सयंमपूर्ण अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर छत्रपती संभाजी किंग्स संघाने पुणेरी बाप्पा संघाचा 7 गडी राखून पराभव करत तिसरा विजय मिळवला.

गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर सुरु झालेल्या या स्पर्धेत विजयासाठी छत्रपती संभाजी किंग्स संघाला 145 धावांचे आव्हान होते. सलामवीर सौरभ नवले 6 धावांवर तंबूत परतला. ओमकार खाटपे (30धावा) व ओम भोसले (27धावा) यांनी दुसऱ्या विकेटसाठी 34 चेंडूत 50 धावांची भागीदारी करून संघाच्या डावाला आकार दिला. आठव्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर ओम भोसले 27 धावांवर झेल बाद झाला. रोशन वाघसरेने त्याचा बळी घेत अडसर दुर केला. त्यानंतर दिग्विजय पाटीलने 32 चेंडूत नाबाद 48 धावांची संयमी खेळी केली. त्याने 9 चौकार मारले. दिग्विजय पाटील व ओमकार खाटपे (30धावा) यांनी चौथ्या विकेटसाठी 38 चेंडूत 52 धावांची भागीदारी करून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

Exit mobile version