| जुन्नर | प्रतिनिधी |
रयतेच्या हितासाठी शिवाजी महाराजांनी कोणतीही तडजोड केली नाही. आदर्श डोळ्यासमोर ठेऊन राज्य सरकार कारभार करत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किल्ले शिवनेरी येथे व्यक्त केले शिवजयंतीनिमित्त मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित अभिवादन सभेत मुख्यमंत्री बोलत होते.
स्वराज्यातील सर्व गडकोटांचा विकास व्हावा या युवराज छत्रपती संभाजी राजांच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांच्या सूचना जनहितासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून इतिहास जतन करण्याचं काम सुरू आहे. शिवनेरी किल्ल्याचा विकास दर्जेदार पद्धतीने पूर्ण होईल. वढू तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी शासन निधी कमी पडू देणार नाही.असे त्यांनी सांगितले.दरम्यान,याच कार्यक्रमात शिवभक्तांना अडविले म्हणून माजी खा.छत्रपती संभाजीराजे यांनी भर कार्यक्रमातच तीव्र नाराजी व्यक्त केली.