। कर्जत । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी महावितरणच्या विरोधात सोमवार दि.12 ऑगस्टपासून वीजग्राहक संघर्ष समितीच्यावतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.
कर्जत शहरात आणि ग्रामीण भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. बिल भरमसाठ येत आहे. महावितरणकडे अनेक वेळा तक्रारी करूनही समस्येचे निराकरण झाले नाही. यामुळे कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समिती आक्रमक होत असून साखळी उपोषणाचा मार्ग अवलंबिला आहे. शनिवारी (दि.17) या उपोषणाचा सहावा दिवस होता.
कर्जत शहरातील लोकमान्य टिळक चौकमध्ये या साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली. मंगेश रुठे, कैलास म्हामले, जगदीश दगडे, हरेश सोनावळे, प्रशांत मराडे, रोशन दगडे, महेश भगत, किशोर गायकवाड, नरेश जाधव, सतीश पाटील, अॅड. प्रीती तिवारी, अॅड. ज्योस्त्ना जाधव, सुरेश विलकर, अॅड. भारती ढाकवळ, कल्पना वांजळे, प्रीती शेळके, नरेश कोळंबे लाक्षणिक उपोषणास बसले असून त्यांना कर्जत तालुक्यातील शेकडो नागरिकांनी साखळी पद्धतीने पाठिंबा दिला आहे.