। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल व उरणच्या नागरी प्रश्नावर सरकारचे पूर्ण दुर्लक्ष आहे. सरकार फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याने आगामी निवडणुकीत हे सरकार बदलणे गरजेचे असल्याचे मत शनिवारी (दि.17) पनवेल-उरण महाविकास आघाडीचे अध्यक्ष बबन पाटील यांनी पनवेल येथे आयोजित एल्गार परिषदेमध्ये व्यक्त केले.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका केव्हाही लागण्याची शक्यता असून सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. महाविकास आघाडीने पनवेलमध्ये दंड थोपटले आहेत. यासंदर्भात शनिवारी पनवेलमधील वीरूपक्ष मंगल कार्यालय येथे उरण-पनवेल महाविकास आघाडी तसेच सिडको व पनवेल महानगरपालिका बाधित प्रकल्पग्रस्त संघटनांच्या प्रमुख उपस्थितीत एल्गार परिषेदेचे आयोजन करण्यात आले होते. या एल्गार परिषदेला पनवेल-उरण महाविकास आघाडीचे अध्यक्ष बबन पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, भावना घाणेकर, नारायण घरत, सुदाम पाटील, आर.सी. घरत, रामदास पाटील, एकनाथ म्हात्रे, सतीश पाटील, सुधाकर पाटील, गणेश कडू, हेमराज म्हात्रे, महेश साळुंखे, अॅड.सुरेश ठाकूर, शेकाप नेते काशिनाथ पाटील, शशिकांत बांदोडकर, भिमकांत पाटील, विश्वास पेटकर, गुरुनाथ पाटील, पराग मोहिते, राजेश केणी, वामन शेळके, शेकापचे देवा पाटील आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते व शेतकरी बांधव उपस्थित होते.