शिलार धरणाविरोधात साखळी उपोषण

वर्क ऑर्डर रद्द करून प्रकल्प कायमचा बंद करण्याची मागणी; 22 गावांतील ग्रामस्थ ठाम

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील पोश्री नदीवरील प्रस्तावित शिलार धरणाची वर्क ऑर्डर रद्द करून प्रकल्प कायमचा रद्द करावा, या मागणीसाठी शिलार धरण जनआंदोलन समितीने साखळी उपोषण करण्याचा निर्धार केला आहे. या आंदोलनात 22 गावे आणि आदिवासी वाड्यांतील ग्रामस्थ सहभागी होणार असून, 15 दिवसांत मागणीचा विचार न झाल्यास उपोषण सुरू करण्याचा इशारा समितीचे प्रमुख दिनेश रसाळ यांनी दिला आहे.

स्थानिक शेतकऱ्यांना पूर्वसूचना किंवा नोटीस न देता तसेच ग्रामसभा व जनसुनावणी न घेता धरणाच्या कामाची निविदा काढून मे. महालक्ष्मी एसईएल कंपनीला कार्यादेश देण्यात आल्याचा आरोप समितीने केला आहे. धरणामुळे जमिनी, घरे, शाळा, मंदिरे आणि स्मशानभूमी बाधित होण्याची शक्यता असून, पुनर्वसनाचेही नियोजन नसल्याचे समितीचे म्हणणे आहे. याबाबत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, संबंधित मंत्री, रायगडचे पालकमंत्री, खासदार, आमदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदने देण्यात आली आहेत.

Exit mobile version