| नवी मुंबई | प्रतिनिधी |
आ. संजय शिरसाट यांची सिडकोच्या अध्यक्षपदी वर्णी लावण्यात आली असून, त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार नुकताच स्वीकारला. याप्रसंगी सिउकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, सहव्यवस्थापकीय संचालक शान्तनु गोयल, सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख, सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप ढोले, आणि मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे उपस्थित होते.
याप्रसंगी नवनियुक्त अध्यक्ष आ. संजय शिरसाट यांनी, राज्याच्या विकासामध्ये सिडकोने आजवर महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नगर नियोजन व विकास क्षेत्रातील अग्रगण्य प्राधिकरण ही सिडकोची ओळख कायम ठेवण्यासह सिडको विकसित करत असलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना शहर, महागृहनिर्माण योजना इ. महत्त्वाकांक्षी प्रकल्प नियोजित कालावधीत पूर्ण करण्यावर आपला भर असणार आहे. त्याचप्रमाणे, नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे निर्णय घेण्यासही आपले प्राधान्य असणार आहे. सर्वसामान्यांना परवडणार्या दरातील घरे उपलब्ध करून देण्याचे सिडकोचे उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण होणार आहे, असे उद्गार काढले.