| नाशिक | प्रतिनिधी |
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. त्यांना अगोदर महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावर पाणी सोडावे लागले. आता त्यांना विशेष तपास पथकाने (एसआयटी) समन्स बजावल्याची माहिती खास सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे अशोक खरात व्यतिरिक्त या प्रकरणात पहिल्यांदाच राजकीय व्यक्तीची चौकशी होणार आहे. चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची आणि त्यांना सहआरोपी करण्याची मागणी उद्धव ठाकरे सेनेच्या नेता सुषमा अंधारे आणि त्यांच्याच पक्षाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली होती. याप्रकरणी सरकारवर मोठा दबाव आला होता. दोन्ही पदाचा राजीनामा दिल्यानंतर लागलीच रुपाली चाकणकर यांच्या पाठीमागे चौकशीचा ससेमिरा लागल्याचे समोर येत आहे.







