चाकरमान्यांची परतीच्या प्रवासाची लगबग

तळा बसस्थानक प्रवाशांनी हाऊसफुल्ल

| तळा | वार्ताहर |

आपल्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिल्यानंतर गणेशोत्सवासाठी गावाला आलेले चाकरमानी पुन्हा परतीच्या प्रवासाला लागले आहेत. यामुळे तळा बसस्थानकात प्रवाशांची गर्दी झाल्याचे चित्र पहायला मिळाली.

गणेशोत्सव काळात पाच दिवस गणरायाची मनोभावे पूजाअर्चा, आरती, भजन करून शेवटच्या दिवशी बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप देऊन पुढच्या वर्षी लवकर या असा आग्रह धरून चाकरमानी पुन्हा आपल्या परतीच्या प्रवासाला लागले आहेत. यासाठी तळा बसस्थानकात बसमध्ये आपली आरक्षित केलेली जागा शोधण्यासाठी प्रवाशांची लगबग पाहायला मिळाली. चाकरमानी प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी प्रशासनाकडून बसस्थानकातून एसटीची जादा वाहतूक व्यवस्था करण्यात आली होती.

Exit mobile version