आव्हानवीरांची बुद्धीबळ स्पर्धा

भारताच्या डी. गुकेशने रचला इतिहास

| टोरंटा | वृत्तसंस्था |

भारताचा 17 वर्षीय डी. गुकेशने सोमवारी कॅनडातील टोरंटो येथे खेळल्या जाणाऱ्या आव्हानवीरांची बुद्धीबळ स्पर्धा 2024 मध्ये इतिहास रचला आहे. ही स्पर्धा जिंकणारा तो जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. विजेतेपदाबरोबरच डी. गुकेश हा 40 वर्षांपूर्वी गॅरी कास्पारोव्ह यांनी रचलेला विक्रम मोडत जागतिक विजेतेपदाच्या शर्यतीमधील सर्वात कमी वयाचा आव्हानवीर ठरला आहे. विश्वनाथन आनंद नंतर स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय आहे.

स्पर्धेतील 14 व्या आणि शेवटच्या फेरीत गुकेशने अमेकिरेच्या हिकारू नाकामुराविरोधातील डाव बरोबरीत सोडवला. तसेच, स्पर्धेत 14 पैकी 9 गुण मिळवले. आव्हानवीरांची बुद्धीबळ स्पर्धा ही विश्वविजेत्या बुद्धिबळपटूला आव्हान देणारा बुद्धिबळपटू निवडण्यासाठी आयोजित केली जाते. दरम्यान, आव्हानवीरांची बुद्धीबळ स्पर्धा जिंकल्यानंतर आता यावर्षाच्या अखेरीस होणाऱ्या लढतीमध्ये डी. गुकेशची गाठ चीनचा विश्वविजेता बुद्धिबळपटू डिंग लिरेन याच्याशी पडणार आहे.

डी. गुकेश हा या लढतीसाठी पात्र ठरलेला सर्वात कमी वयाचा बुद्धिबळपटू ठरला आहे. याआधी महान बुद्धिबळपटू गॅरी कास्पारोव्ह यांनी 1884 मध्ये 22 वर्षांचे असताना अनातोली कारपोव्ह यांच्याविरुद्ध होणाऱ्या लढतीसाठी क्वालिफाय केले होते.

टूर्नामेंट जिंकण्याबरोबरच गुकेशने 88,500 युरो (अंदाजे 78.5 लाख रुपये) रोख बक्षीसही जिंकले. उमेदवारांसाठी एकूण बक्षीस रक्कम 5,00,000 युरो होती. ही प्रतिष्ठित स्पर्धा जिंकणारा ग्रेट विश्वनाथन आनंदनंतर गुकेश दुसरा भारतीय ठरला. पाच वेळा विश्वविजेता आनंदचा विजय 2014 मध्ये आला होता.

या विजयामुळे मला खूप आनंद झाला आहे. मी फॅबियो कारुआना आणि इयान नेपोमनियाच्ची यांच्या खेळाला अनुसरण करत होतो. त्यानंतर मी आणखी एक बुद्धिबळपटू ग्रेगोरज गाजेव्स्की यांच्याशीही चर्चा केली. मला वाटतं ती चर्चा खूप उपयुक्त ठरली.

आव्हानवीर डी. गुकेश

सर्वात तरुण चॅलेंजर बनल्याबद्दल डी. गुकेशचे अभिनंदन. वाका चेस कुटुंबाला तुम्ही जे काही साध्य केले त्याचा अभिमान वाटतो. तुम्ही ज्या प्रकारे खेळलात आणि कठीण प्रसंग हाताळलेत त्याबद्दल मला वैयक्तिकरित्या खूप अभिमान वाटतो. या क्षणाचा आनंद घ्या.

विश्वविजेता विश्वनाथन आनंद
Exit mobile version