| वाघ्रण | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील वाघ्रण येथे दिनांक 21 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर दरम्यान सलग अकराव्या वर्षी चंपाषष्ठी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. वाघ्रण येथील कडेपठार महाराज श्री खंडेराय भक्त दिपक अनंत पाटील यांच्या निवासस्थानी हे आयोजन करण्यात आले आहे.
पंचक्रोशी सह तालुक्यात प्रसिद्ध हा उत्सव मार्गशिर्ष शुद्ध प्रतिपदा 21 नोव्हेंबर ते मार्गशिर्ष शुद्ध षष्टी 26 नोव्हेंबर 2025 या काळात होत असून, त्या निमित्त विविध धार्मिक अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. या मध्ये प्रथम दिनी अभिषेक व घटस्थापना तसेच मार्तंड पारायण सकाळी 11 वाजता प्रारंभ होणार आहे. शनिवारी रात्री 9 वाजता गोपाळ कृष्ण प्रासादिक भजन मंडळ मानकुळे गायक स्वराज पाटील मृदुंग साथ कुशांत पाटील तर रविवारी श्री दत्त प्रासादीक भजन मंडळ नवगाव गायक किशोर बुवा बोराडे मृदुंग साथ भूषण म्हात्रे तबला दर्शन पवार तसेच सोमवारी रात्री जय हनुमान भजन प्रासादीक मंडळ वाघण चा भजनांचा कार्यक्रम होणार आहे. मंगळवारी रात्री 7 वाजता श्री. शिवभैरव गोंधळ मंडळ शहाबाज चा जागरण गोंधळ होणार आहे.
अखेरच्या दिवशी सकाळी 11 वाजता मार्तंड विनय ग्रंथ पारायण समाप्ती तर दुपारी 12 वाजल्यापासून देवाचा तळीभंडारा व महाप्रसाद असा कार्यक्रम होणार असल्याचे प्रसिद्ध केले आहे. उत्सवाची तयारी जोरदार सुरू असून, या कार्यात दीपक पाटील यांच्या मातोश्री सुरेखा पाटील वडील अनंत पाटील भाऊ मनोज पाटील यांच्या सह मित्र अनेक ग्रामस्थ भाऊबंद शेजारी श्री मार्तंड भक्त सहकार्य करताना दिसत आहेत. प्रशस्त मंडप दुतर्फा रोशनाई आकर्षक प्रवेशद्वार बैठक व्यवस्था आणि रेलचेल यामुळे भक्तिमय वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे. या सोहळ्याला शहरांतून देखील उपस्थिती लावतात हे विशेष आहे.
वाघ्रण येथे चंपाषष्ठी सोहळा
