महाड प्रीमियर लीग स्पर्धेत चॅम्पियन्स स्पोर्ट्स संघ विजयी

। महाड । प्रतिनिधी ।
महाड शहरातील चांदे क्रिडांगणार अनिकेत समर्थ ग्रुप आयोजित महाड प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत चॅम्पियन्स स्पोर्ट्स संघाने अंतिम सामन्यात अवनिश अद्विक संघावर मात करत प्रथम क्रमांकचा मानकरी ठरला आहे.
या स्पर्धेच्या बक्षीस समारंभासाठी लक्ष्मण भोसले, वैभव भोसले, सिद्धेश पाटेकर, इम्रान पठाण, बंधू तरडे, अमित शेट्टी, भाग्यश्री फुटाणकर, संजय चिखले, प्रणव दळवी, सिद्धेश शेठ, रवी शिंदे, सनी सावंत, सुभाष मोरे, अमित फुटाणकर आदी मान्यवर उपस्थित होते. अनिकेत समर्थ ग्रुपने आशिष चिखले यांच्या अध्यक्षतेखाली या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत 16 संघ नी सहभाग घेत क्रिकेट मधील खेळाचा आनंद लुटला. या स्पर्धेत विजयी चॅम्पियन्स स्पोर्ट्स संघाला रोख 50 हजार व चषक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले तर उपविजेता अवनिश अद्विक संघाला 30 हजार व चषक, तृतीय क्रमांक डिझाइन स्टुडिओ संघाला रोख 20 हजार व चषक प्रदान करण्यात आले तसेच संघाला चतुर्थ क्रमांक रायगड इंटरप्रायजेस संघाला 20 व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेत मालिकाविर म्हणून चॅम्पियन्स स्पोर्ट्स महाड संघाचा सुरज करकरे, उत्कृष्ट फलंदाज निखील पारवे, उत्कृष्ट गोलंदाज आदिल सय्यद, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक विजय मांडे, स्पर्धेतील उद्योन्मुख खेळाडू ओसामा पेवेकर आदींना गौरविण्यात आले.

Exit mobile version