ज्युनिअर गटात पटकाविली चॅम्पियनशिप
| उरण | वार्ताहर |
द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन व सेव्हन स्टार फुटबॉल अकादमी उरणच्या संयुक्त विद्यमाने 14 आणि 15 मे रोजी मध्य प्रदेश येथे आयोजित केलेल्या दहाव्या ज्युनियर आणि सिनियर 7ए साईड फुटबॉल नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत 14 वर्षांखालील मुलांनी उत्तरप्रदेश संघाचा पराभव करीत चॅम्पियनशिप पटकाविली. सेव्हन स्टार फुटबॉल अकादमीने राज्याचे प्रतिनिधीत्व करताना ही कामगिरी केली. या बद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
या स्पर्धेत देशभरातून 15 राज्यांतील संघांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये प्रथम क्रमांक पटकवित चॅम्पियनशिप पटकाविली. सोहन नवलगी या खेळाडूला उत्कृष्ट कामगिरीबद्दल बेस्ट गोलकिपरचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. सेव्हन स्टार फुटबॉल अकादमीचे मुख्य प्रशिक्षक प्रवीण संग्राम तोगरे व सहाय्यक प्रशिक्षक तनिष्क प्रवीण तोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी राज्याबाहेर कौतुकास्पद कामगिरी केली आहे.