अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा

। मुंबई । प्रतिनिधी ।

महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या मान्यतेने, सांगली जिल्हा कबड्डी असो.च्या विद्यमाने व युवक मराठा क्रीडा संस्था यांच्या सहकार्याने दि. 28 डिसेंबर ते 1 जाने 2025 या कालावधीत कुमार व कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सांगलीतील सांगलवाडी येथील चिंचबाग मैदानात पार पडणार आहेत. तसेच, या स्पर्धेतून निवडण्यात आलेला कुमार व कुमारी गटाचा संघ दि. 8 ते11 जाने. 2025 या कालावधीत हरिद्वार येथे होणार्‍या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

ही स्पर्धा सकाळ व सायंकाळ या दोन्ही सत्रात खेळविण्यात येणार आहेत. या स्पर्धेत सहभाग घेतलेल्या सर्व संलग्न जिल्हा मुलींच्या संघाने दि.27 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता स्पर्धेच्या ठिकाणी आपली उपस्थिती राखावी. त्याच दिवशी मुलींची वजने व छाननी केली जाणार आहे. तर, मुलांच्या सर्व संघानी दि. 29 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता उपस्थिती राखावी. याच दिवशी मुलांची वजने व छाननी करण्यात येणार आहे. सर्व जिल्हा संघटनांच्या सचिवांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन राज्य कबड्डी असो.चे सचिव बाबुराव चांदेरे यांनी केले आहे.

Exit mobile version