| नागपूर | वृत्तसंस्था |
मान्सूनच्या परतीचा अंतिम टप्पा सुरू असताना अरबी समुद्रात पुन्हा एकदा चक्रीय स्थिती तयार होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर सामान्यपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हा पाऊस ‘ऑक्टोबर हीट’ पासून नागरिकांची सुटका करेल का, हे मात्र निश्चित नाही.13 ते 14 ऑक्टोबरदरम्यान अरबी समुद्रात चक्रीय स्थिती तयार होण्याची शक्यता असून त्याचा प्रभाव महाराष्ट्रावर होण्याची शक्यता असून काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुण्यासह महाराष्ट्रात 14 ऑक्टोबरच्या संध्याकाळपासून हवामान बदलण्यास सुरुवात होईल. 15 आणि 16 ऑक्टोबरला शहरात हलका ते मुसळधार पाऊस पडेल अशी अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे राज्यातील इतर भागातही पावसाची शक्यता आहे.