राज्यात पावसाची शक्यता

| मुंबई | वृत्तसंस्था |

राज्यात पुढील काही दिवस पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने पुढील 3-4 दिवस पावसाचा अंदाज वर्तवला आहे. राज्यात पुण्यासह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. याशिवाय मुंबईतही 25 आणि 26 नोव्हेंबरला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईसह इतर भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात तयार होऊ घातलेल्या चक्रीवादळामुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि मराठवाड्यातील धाराशिव, लातूर जिल्ह्यात जोरदार वारे, विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक, बीड, नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. रविवारी उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

Exit mobile version