राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

। मुंबई । वृत्तसंस्था ।
राज्यात सध्या अवकाळी पाऊस सुरु आहे. राज्यात उन्हाळ्याची चाहूल लागली असता अशात अवकाळी पावसाने आता शेतकर्‍यांची चिंता वाढवली आहे. राज्यात पुढील तीन ते चार दिवस दक्षिण कोकण आणि लगतच्या दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तुरळक ठिकाणी हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी ट्वीट करत ही माहिती दिली. एस होसळीकर यांनी ट्वीट केले, पुढील तीन ते चार दिवस दक्षिण कोकण आणि लगतच्या दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तुरळक ठिकाणी हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

Exit mobile version