केएल राहुल, ध्रुव जुरेलला संधी

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा 22 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. जिथे दोन्ही संघ पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील बॉर्डर-गावसकर ट्रॉफी खेळतील. यासाठी केएल राहुल आणि ध्रुव जुरेल यांचाही भारतीय संघात समावेश आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला व्हाईटवॉश मिळाला. हा पराभव जिव्हारी लागण्याचे कारण म्हणजे, भारतीय संघ आपल्या घरच्या मैदानावर ही मालिका खेळत होता. आता भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा 22 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. जिथे दोन्ही संघ पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील बॉर्डर-गावसकर ट्रॉफी खेळतील. यासाठी केएल राहुल आणि ध्रुव जुरेल यांचाही भारतीय संघात समावेश आहे. या मालिकेच्या आधी राहुल आणि जुरेल यांना एक विशेष संधी मिळणार आहे. या दोघांचाही भारत अ संघात समावेश झाला असून, बॉर्डर-गावसकर मालिकेआधी यांच्याकडे सरावाची चांगली संधी असेल.

भारतीय संघाचा फलंदाज केएल राहुल आणि युवा यष्टीरक्षक ध्रुव जुरेल यांना बॉर्डर-गावसकर मालिकेपूर्वी सराव करण्याची महत्त्वाची संधी मिळणार आहे. बीसीसीआयने आगामी ऑस्ट्रेलिया दौर्‍यात दोन्ही खेळाडूंचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. एका वृत्तानुसार, राहुल आणि जुरेल मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या दुसर्‍या चार दिवसीय अनधिकृत कसोटीत भाग घेतील. हा सामना 7 ते 10 नोव्हेंबर दरम्यान खेळला जाईल.

Exit mobile version