। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील टी-20 मालिकेची जोरदार चर्चा सुरु आहे. बीसीसीआयने नुकतेच या मालिकेसाठी युवांनी भरलेला भारतीय संघ जाहीर केला आहे. यामध्ये ओपनिंग कोण करणार हा प्रश्न आहे? यासाठी सबा करीम यांनी भारतीय संघाचा पर्याय सुचवला आहे. जो की चाहत्यांना नक्कीच आकर्षित करेल.
भारत आणि बांग्लादेश यांच्यातील टी-20 मालिकेला 6 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. भारताच्या संघात अनेक तरुण चेहरे पाहायला मिळणार आहेत. संघाची कमान सूर्यकुमार यादवच्या हाती असेल. दरम्यान, सबा करीमने बोलताना म्हणाले की, रिंकू सिंग आणि अभिषेक शर्मा यांना सलामीवीर म्हणून एकत्र पाहण्याची दाट शक्यता आहे. रिंकूला आतापर्यंत या संघात ज्या काही संधी मिळाल्या आहेत तो सहा किंवा सातव्या क्रमांकावर आला आहे. त्याला खेळण्यासाठी कमी चेंडू मिळतात. त्यामुळे त्याला अधिक संधी मिळाल्यास तो संघात अधिक मूल्य वाढवू शकतो. या मालिकेत रिंकू वरच्या क्रमांकावर खेळेल याची शक्यता आहे.