महराष्ट्रात ‘उद्धव-राज’ एकत्र येणार?

| मुंबई | प्रतिनिधी |
सध्या सुरु असलेल्या सत्तासंघर्षामुळे संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्याने शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. अशातच मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्यासाठी घातलेली भावनिक साद सध्या चर्चेत असून मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे विश्वासू अभिजीत पानसे यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांची सामना कार्यालयात भेट घेतल्याने ते उद्धव-राज एकत्र येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

याबाबत अभिजीत पानसे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी ते म्हणाले की, मनसे पक्षात इतक्या मोठ्या स्थानावर नाही. मी राज ठाकरेंचा कट्टर सैनिक आहे. त्यामुळे तशी वेळ येणार असेल तर मला माहिती नाही. युतीवर चर्चा करायची असेल, तर स्वतः राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यावर बोलतील.

मला संजय राऊतांनीच राजकारणात आणलं होतं. मी माझ्या वैयक्तिक कामासाठी संजय राऊतांना भेटण्यासाठी सामनाच्या कार्यालयात गेलो होतो. त्याचे वेगळे अर्थ लावू नका. या भेटीत राजकीय चर्चांचा काहीही संबंध नाही. माझे संजय राऊतांशी फार जुने संबंध आहेत. मला संजय राऊतांनीच राजकारणात आणलं होतं. त्यामुळे मला त्यांना काही कामानिमित्त भेटायचं होतं, असं मत अभिजीत पानसे यांनी व्यक्त केलं.

Exit mobile version